मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ नितीशकुमार घेतील असे भाजप आणि जदयुच्या वतीने सांगण्यात येत आहे. अशातच नितीश कुमार यांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोबत येण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होतील, असे स्पष्ट केले आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
भाजपा ही शब्दाला पक्की आहे, त्यामुळे निवडणुकांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे नितीशकुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील निवडणुकांवेळी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असे अनेक संभांमध्ये जाहीरपणे सांगण्यात आले होते. मोदींनी उद्धव ठाकरेंच्या समोर भाषणात सांगितले होते की, मुख्यमंत्री हा भाजपाचाच होईल. तर बिहारमध्ये मोदींनीच जेदयुचा मुख्यमंत्री होईल, असे स्पष्टपणे सांगितल्याची आठवणही फडणवीस यांनी करुन दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘वारंवार देशात स्वतःचा कचरा करून घेतल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी करणार रिटेल क्षेत्रात प्रवेश ! अॅमेझॉन, वॉलमार्टला देणार टक्कर
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत, नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार : भाजप


