🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : पारनेर नगरपंचायत निवडणूकीसाठी काल प्रभागनिहाय आरक्षण सोडत डॉ.आंबेडकर भवन पारनेर येथे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ.सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. सोडतीत काही ठिकाणी आरक्षण बदलल्याने इच्छुकांनी आनंद व्यक्त केला तर ज्यांच्या प्रभागात आरक्षण पडले असे इच्छुक नाराज झाले. नगरपंचायत आरक्षण सोडतीत आजी-माजी उपनगराध्यक्षांचा प्रभाग राखीव झाला असून, आरक्षणाचा फटका काही विद्यमान नगरसेवकांनाही बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. विद्यमान नगराध्यक्षा वर्षा नगरे यांचा प्रभाग सर्वसाधारण जागेसाठी खुला झाला आहे.
पारनेरचे माजी आमदार विजयराव औटी यांचे पुत्र माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा प्रभाग क्रमांक ८ हा अनुसूचित जातीसाठी तर चंद्रकांत चेडे यांचा प्रभाग ६ हा महिला राखीव झाला आहे तर विद्यमान उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट यांचा प्रभाग २ हा देखील महिला आरक्षित झाला आहे. राखीव असलेला नगरसेविका मालन शिंदे यांचा ७ नंबर प्रभाग हा सर्वसाधारण जागेसाठी खुला झाला आहे . तर किसन गंधाडे यांचा १७ क्रमांकाचा प्रभाग महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.
विद्यमान नगरसेविका शशिकला शेरकर यांचा १२ क्रमांकाचा प्रभाग आता सर्वसाधारण झाला आहे. तर नंदकुमार देशमुख यांचा ११ क्रमांकाचा प्रभाग महिलेसाठी राखीव झाला आहे. नंदकुमार औटी यांचा प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. डॉ.मुद्दसिर सय्यद यांचा प्रभागही आता महिलेसाठी राखीव झाला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील विद्यमान नगरसेविका विजेता विलास सोबले यांचा चार क्रमांकाचा प्रभाग आता सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे ह्या आरक्षणाचा फटका काही विद्यमान नगरसेवकांनाही बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- चाहत्यांना संदेश देण्यासाठी रणवीर सिंग चढला गाडीच्या टपावर; रणवीरच्या हटके स्टाइलची चर्चा !
- टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी करणार रिटेल क्षेत्रात प्रवेश ! अॅमेझॉन, वॉलमार्टला देणार टक्कर
- राज ठाकरेंच्या दरबारात कोळी बांधव, बँडवाले आणि वारकऱ्यांनी देखील मांडली गाऱ्हाणी
- एका महिन्यात डेटा चोरीच्या सहा घटना उघडकीस; सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
- रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार; किरिट सोमय्या यांचा गंभीर आरोप

