Share

SC Notice । मोठी बातमी : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Published On: 

🕒 1 min read

SC Notice । मुंबई : देशात सध्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरु आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. त्यानंतर त्यांची चौकशी सुद्धा झाली. तर पुढे शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली आहे. यानंतर पुढे आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस दिली आहे.

या सर्वांना बहुचर्चित लवासा प्रकरणात सहा आठवड्यांत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर हाय कोर्टासह विविध खंडपीठांसमोर सुनावणी झाली. मुळशी तालुक्यातील लवासा हे हिल स्टेशन म्हणून विकसित करण्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाचा परिणाम झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते.

मुळशी तालुक्यातील लवासा हे हिल स्टेशन म्हणून विकसित करण्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाचा परिणाम झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. दरम्यान, याचिकेनुसार, हिल स्टेशन म्हणून अधिसूचित केलेल्या 18 गावांच्या जमिनी 2002 मध्ये महामंडळाला किरकोळ दराने विकल्या गेल्या. तसेच लवासा प्रकल्प हा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अधिनियमाचे उल्लंघन करून विकसित केल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. शिवाय याचिका करण्यास झालेल्या विलंबाचे खूपच तांत्रिक कारण उच्च न्यायालयाने देऊन याचिका निकाली काढली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!