मुंबई : सैफ अली खानची वेब सीरीज तांडव सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वेब सीरीजवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत या वेब सीरीजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. तसेच लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन प्राईमने माफी मागितली आहे.
अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेल्या तांडवमध्ये हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आल्याच्या आरोपामुळे वेबसिरिजच्या दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि अमेझॉन प्राइमच्या कंटेंट हेडविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल झाल्यानंतर अमेझॉन प्राईमच्या हिंदुस्थानातील कंटेट चीफ असलेल्या अपर्णा पुरोहित यांच्या देखील अडचणी वाढल्या होत्या.
‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेबसिरीजविरोधातील वाढता तणाव लक्षात घेत जाहीर माफी मागितली होती. दरम्यान, आज तांडव वेब सीरिजमुळे सुरु असेल्या विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.सुप्रीम कोर्टाने तांडवसाठी लखनौमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासात अपर्णा यांना सहकार्य करण्यास सांगितलं आहे. त्याचसोबत अपर्णा पुरोहित यांना सुप्रीम कोर्टानं दिलासाही दिला असून सध्या त्यांची अटके टळली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…


