दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.
चेन्नईच्या २१९ धावांचा पाठलाग करताना मुंबईची स्थिती एकवेळ ८१ धावावर ३ गडी बाद अशी झाली होती. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पोलार्डने धमाकेदार फलंदाजी करत सामना मुंबईच्या बाजुने फिरवला. या विजयानंतर मुंबईच्या चाहत्यानी सोशल मीडीयावर पोलार्डला ‘पोलार्ड तात्या’ म्हणत अनेक पोस्ट शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
चेन्नई वाल्यांचा झोपायला नकार!
डोळे मिटले की,पोलार्ड तात्या दिसतोय म्हणे!
????????????— Harshad Bhosale (@Harshbhosale03) May 1, 2021
@mipaltan मानलं पोलार्ड तात्या ला ????????????????
— Prasad Tare (@PrasadTare8) May 1, 2021
आयुष्य सुंदर आहे.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी
पोलार्ड तात्या सारखं पाय रोवून
मैदानात थांबता आलं पाहिजे.
????????????????????#MIvsCSK— YO shelar (@im_yo21) May 1, 2021
King Pollard supremacy????#IPL2021 #CSKvsMI #MIvCSK pic.twitter.com/uUzTakx6Zg
— Fenil Kothari (@fenilkothari) May 1, 2021
मुंबईच्या एका चाहत्याने पोलार्डचा एक फोटो शेअर करत ‘बॉईज रिलॅक्स’ असे लिहिलेले मीम शेअर केले. तर एका चाहत्याने ट्विट केले की ‘मानलं पोलार्ड तात्याला.’ दुसऱ्या एका चाहत्याने ‘आयुष्य सुंदर आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पोलार्ड तात्या सारखं पाय रोवून मैदानात थांबता आलं पाहिजे,’ असे ट्विट केले. तर एकाने ‘चेन्नई वाल्यांचा झोपण्यास नकार! डोळे मिटले की पोलार्ड तात्या दिसतोय म्हणे!’ या सारखे अनेक पोस्ट शेअर करत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी पोलार्डचे कौतुक करत आनंद साजरा केला.
महत्वाच्या बातम्या
- बंगालच्या रणसंग्रामात माजी क्रिकेटपटूंचा सामना; दिंडा पिछाडीवर तर तिवारी आघाडीवर
- फाफ डू प्लेसिसची ‘ती’ चूक चेन्नईला पडली सर्वात महागात
- नंदिग्राममध्ये भाजपचे ‘बुरे दिन’ सुरु, ममता दिदींनी घेतली आघाडी !
- पंढरपुरात बिचुकलेंचे होणार डिपॉझिट जप्त ; १९ व्या फेरीअखेर अवघे ५४ मते
- पहिल्यांदाच मुंबईने केला २०० पेक्षा धावांचा पाठलाग; ‘या’ संघाने केला सर्वाधिक वेळा पाठलाग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

