Share

पंढरपुरात बिचुकलेंचे होणार डिपॉझिट जप्त ; १९ व्या फेरीअखेर अवघे ५४ मते

Published On: 

पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण १९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होताना दिसत आहे.

लोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते. ‘ही निवडणूक मीच जिंकणार’ असा विश्वास घेवून अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बिचुकलेंनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात अचानक उडी घेतल्यामुळे येथील रंगत वाढली होती.

मात्र, १९ व्या फेरीपर्यंतच्या आडेवाडीनुसार अभिजीत बिचुकले यांना केवळ ५४ मतं मिळाली आहेत. म्हणजे, बिचुकले यांना तीन आकडीही संख्या गाठता आली नाही. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शैला गोडसे यांनाही फक्त ८०० मतं मिळाली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!