Share

बंगालच्या रणसंग्रामात माजी क्रिकेटपटूंचा सामना; दिंडा पिछाडीवर तर तिवारी आघाडीवर

Published On: 

कोलकाता : एकाबाजूला देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असतानाच देशात पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी या राज्यांच्या निवडणुकांसह अनेक लोकसभा व विधानसभांच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये प्रमुख चुरस निर्माण झाली असून या राज्याच्या निकालांना अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी आपलं नशीब चाचपून बघतायत. माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा हा भाजपच्या उमेदवारीवर मोयना या मतदारसंघातून उभा राहिला होता. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकड्यानुसार दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत अशोक दिंडा दुसऱ्या स्थानी आहे. तृणमूल काँग्रेसचे संग्राम डोलाई हे आघाडीवर असून त्यांना ६३२१ मते मिळाली आहेत. तर अशोक दिंडा ला ५६२६ मते मिळाली आहेत. अजून बऱ्याच फेऱ्या बाकी असल्याने कोण जिंकेल हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

तर दुसरीकडे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला शिबपूर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली असून सध्या त्याला मोठी आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे रथिन चक्रवर्ती असून या दोघांमध्ये ५८०० हुन अधिकचा फरक आहे. मनोज तिवारी याला २३८२२ इतके मतं मिळाली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!