कोलकता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.
सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०२ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपचे शुभेन्दु अधिकारी सकाळपासून आघाडीवर होते. मात्र, आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जसजसा पुढे सरकताना दिसत आहे तसतसे भाजपचे ग्रह फिरताना दिसत आहेत. कारण काहीवेळापूर्वीच नंदीग्राम मतदारसंघात पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकले आहे. आता सुवेंदू अधिकारी१४१७ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात तृणमूल काँग्रेसची जोरदार घोडदौड सुरु आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा २०० ची वेस ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. तर २०० जागा मिळवण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपची शंभरीतच दमछाक होताना दिसत आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या या अतिभव्य विजयावर तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश, बिहार या राज्यांवर कब्जा करणाऱ्या भाजपचा विजयरथ ममता बॅनर्जी यांनी रोखला असे, वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी केले. भाजपच्या प्रमुख विरोधक म्हणून ममता बॅनर्जी उदयाला आल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आवाज उठवला, असे पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या’
- आरडा ओरडा केला पण…; होम क्वारंटाईन बाप-लेकाचा मृत्यू; दिव्यांग आईची प्रकृती गंभीर
- सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक टी २० सामना’
- बायकोला भेटण्यासाठी चोर कोविड सेंटरमधून पळाला, पण बायकोनेच त्याला पकडून दिले
- बोललो तर बोललो : प्रशांत किशोर यांचे ‘ते’ भाकीत ठरणार खरे !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

