Share

फाफ डू प्लेसिसची ‘ती’ चूक चेन्नईला पडली सर्वात महागात

Published On: 

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

२१८ धावांचा डोंगर उभा करुणही चेन्नईच्या संघाला या सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले. मुंबईचा फलंदाज कायरान पोलार्डने वादळी खेळी करत सामना मुंबईच्या बाजुने फिरवला. यादरम्यान चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसने केलेल्या एका चुकीमुळे सामना जिंकण्याची संधी चेन्नईच्या हातुन गेली. सामन्यातील शार्दुल ठाकुर टाकत असलेल्या १८व्या षटकातील पाचव्या चेंडुवर फाफ डुप्लेसिसने पोलार्डला जिवदान दिले.

शार्दुलने टाकलेल्या या अखुड टप्प्याच्या चेंडुवर पोलार्डने पुल शॉट खेळला. त्यावेळी फाफ डु प्लेसिस लॉंग ऑनवरुन पळत आला आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलार्ड हा ६८ धावांवर खेळत होता. या जिवदानाचा फायदा उचलत पोलार्डने मुंबईला विजयी केले. जर डुप्लेसिसने हा झेल घेतला असता तर कदाचीत सामना चेन्नईच्या बाजुने फिरला असता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!