Share

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराविरोधात विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा  

Published On: 

मुंबई – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर असलेलं रानडे इन्स्टिट्यूट संज्ञापन व वृत्तपत्र विभागासाठी (पत्रकारिता विभाग) देशभरात प्रसिद्ध आहे. 60 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेला आणि या क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखला जाणारा विभाग आहे. परदेशातील अनेक विद्यार्थी येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत असतात. देशभरातील अनेक माध्यमांमध्ये येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. अशा नावाजलेल्या रानडे इन्स्टिट्यूट या विभागाचे स्थलांतर करण्यास विभागातील माजी, आजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शीवला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने, कुलगुरूंनी कुठलीही जाहीर पूर्वसूचना न देता, कोणालाही विश्वासात न घेता राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतला आहे. या जागेची मार्केट किंमत 400 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे या जागेवर अनेकांचा डोळा आहे. या स्थलांतराचा फटका आर्थिकदृष्ट्या गरीब, वंचित विद्यार्थ्यांना बसणार आहे. रानडे इन्स्टिट्यूट हे शासन अनुदानित विभाग आहे. कमी पैश्यांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण येथे मिळते. जर ते विद्यापीठात हलवले तर त्याचा फटका सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना बसेल कारण, विद्यापीठात तो विभाग विना अनुदानित असेल.

या विरोधात वंचित बहुजन आघाडी ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. हा विभाग स्थलांतर करण्यास आमचा विरोध आहे. रानडे बचाव कृती समितीला आमचा पाठिंबा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने विद्यापीठाला धडा शिकवेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!