Share

ग्रेट भेट! सलमानने शेअर केले मीराबाईसोबतच्या भेटीचे फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेटलिफ्टींगमध्ये मीराबाई चानुने रौप्यपदक पटकावत इतिहास घडवला. ४९ किलो गटात मीराबाई चानुने हे पदक पटकावले. यानंतर त्यांचे संपूर्ण भारतभर कौतुक करण्यात आले. नुकतेच मीराबाईने बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची भेट घेतली आहे.

मीराबाई चानू ही सलमान खानची मोठी फॅन आहे. याविषयी तिने एका मुलाखतीत देखील सांगितले होते. सलमान खानला समल्यानंतर मीराबाई चानूची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा फोटो देखील सलमानने  शेअर केला आहे. या फोटोची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानच्या गळ्यात एक शॉल असल्याचे दिसत आहे. या फोटोला सलमान खानने  एक कॅप्शन देत लिहिले की, ‘रौप्यपदक मिळवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, मीराबाई चानूसोबतची प्रेमळ भेट. खूप खूप शभेच्छा तुला’, असे म्हणत मीराबाई चानुच्या यशाचे सलमानने कौतुक केले.

तसेच मीराबाई चानू हिनं महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची देखील भेट घेतली होती. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने माहिती दिली होती. यावेळी सचिननं तिच्या मेडलची पाहणी करताना तिला शुभेच्छा दिल्या तर मीराबाईनं पदक जिंकल्यानंतर सचिननेही तिचे कौतुक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!