🕒 1 min read
मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. यानंतर काही दिवसातच उर्वरीत स्पर्धा युएई येथे आयोजीत करण्याची घोषणा बीसीसीआयने केली.
आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने येत्या १९ सप्टेंबर पासुन सुरु होणार आहे. स्पर्धेला जरी एक महिन्याचा अवधी बाकी असला तरी संघानी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. त्याच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. धोनीचा एक फोटो सीएसकेने ट्विटर हॅडलवर शेअर करत ‘लायॉन एन्ट्री डे’ असे कॅप्शन दिले आहे.
Lion Day Entry ????
????Anbuden Chennai#ThalaDharisanam #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/Ci2G4vBuEQ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 10, 2021
धोनीव्यतीरिक्त सुरेश रैना आणि दिपक चहरही सीएसकेच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार चेन्नईचा संघ १३ ऑगस्ट रोजी दुबईला रवाना होणार आहे. मात्र अद्यापही युएई सरकारने आयपीएल संघाना दुबईत उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यांच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत सीएसके आणि इतर आयपीएल संघ आहेत.
https://www.instagram.com/p/CSZnVeLJIbH/
महत्त्वाच्या बातम्या
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
- देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- भाजप आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेची रणनीती; दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
