Share

‘राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल’

Published On: 

पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत.

नारायण राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजपा असं चित्र पाहायला मिळतं आहे. या वादात आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी उडी घेतली आहे.

पुण्यातील हंडेवाडी येथे बोलताना ते म्हणाले, नारायण राणे यांनी आपल्या पदाला शोभेल असे बालावे, मोजके बोलावे. पण सध्या त्यांचे नाव राणे आणि काम चार आणे असे झाले आहे.राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल.

राणेंनी तोंडावर ताबा ठेवला नाही, तर ईट का जवाब पत्थर से कसा दिला जातो, हे शिवसेनेला शिकवायची गरज नाही, असा निर्वाणीचा इशाराही सत्तार यांनी दिला. दरम्यान, सत्तार यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद आणखी पेटेल असेच दिसत आहे.

महत्त्वाच्याा बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!