टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सेनेची वाट धरली आहे. तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ते आणि कट्टर समर्थकांनी देखील आपल्या पक्षाची साथ सोडत सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते होण्यात आपले हित पाहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खंदे समर्थक आणि खा. सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला रायगड जिल्ह्यात चांगलाच दणका बसला आहे.
महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या खास निकटवर्तीयांपैकी असलेल्या रघुवीर देशमुख यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांचे पारडे जड होणार असं जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचं मत आहे.
देशमुखांच्या शिवसेना प्रवेशाबाबत आ. भरत गोगावले म्हणाले की, रघुवीर देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने रायगड विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यात शिवसेनेला त्यांचा अनुभव आणि अभ्यासाचा फायदा होईल. शिवसेना संघटनेत रघुवीर देशमुखांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. तसेच रघुवीर देशमुख यांनी आपल्या प्रवेशाप्रसंगी विकासकामांना चालना देण्याकरिता आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केलं. पण त्याचवेळी खासदार सुनील तटकरे यांच्या परिवाराविषयी आपल्याला आदर असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस राष्ट्रवादी खीळखिळी होताना दिसत आहे. कारण अनेक मातब्बर नेत्यांनी सत्तधारी भाजप – सेने कडे धाव घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला येणारी निवडणूक खूपचं जड जाणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजप राज्यात एक हाती सत्ता मारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना पशुधन देण्यासाठी आ. महेश लांडगेंची मदतीची ‘हाक’
- शरद पवार घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, ‘या’ महत्वपूर्ण विषयावर होणार चर्चा
- ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला दणका, ‘या’ महिला आमदार करणार शिवसेनेत प्रवेश?
- मतभेद असले तरी समर्थन द्यावे लागते, नारायण राणेंनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

