Share

सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना पशुधन देण्यासाठी आ. महेश लांडगेंची मदतीची ‘हाक’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सांगली, कोल्हापूर परिसरातील भीषण पूरामुळे हजारो शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. शेतातले पीक आणि गोठ्यातले पशुधन डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाले. त्या शेतक-याला आता मदतीची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गोशाळा आणि दहीहंडी उत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतक-यांना पशुधन उपलब्ध करुन द्यावे. त्याद्वारे बळीराजाच्या सेवेचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन भोसरीचे आ. महेश लांडगे यांनी केले आहे.

सांगली, कोल्हापूर परिसरात यावर्षी पावसाने थैमान घातले. महापुरात अनेक गावांतील पशुधनाला मोठा फटका बसला आहे. शेकडो जनावरे वाहून गेली आहे. दगावलेल्या जनावरांचे पंचनामे सुरू आहेत. फक्त सांगली जिल्ह्यातील विचार करता दगावलेले पशुधन, कोंबड्या आदींची संख्या सुमारे दहा हजारांच्या पुढे आहे, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी आणखी मोठी आहे. शेतीला जोड व्यावसाय म्हणून पशुपालन केले जाते.

यावर आ. लांडगे म्हणाले की, पूरपरिस्थितीत बाधित शेतक-यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. प्रशासकीय यंत्रना पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम घेतला. मी माझ्या मतदार संघातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळ, गोशाळा यांना पूरबाधित शेतक-यांना पशुधन भेट देण्याचे आवाहन करत आहे.

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघ तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील संवेदनशील नागरिकांच्या मदतीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्य पोहोच केले. तब्बल ३० टॅम्पोद्वारे त्या-त्या गावात स्वत: उपस्थित राहून स्वत: आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. एका टॅम्पोमध्ये तीनशे ते साडेतीनशे कुटुंबांना उपलब्ध होईल इतके सामान पाठवण्यात आले. आमदार लांडगे, त्यांचे समर्थक नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे १५ हजार पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!