🕒 1 min read
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून बर्मिंगहॅम कसोटी खेळवली जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच दोन्ही संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला असतानाच इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फॉक्सलाही या विषाणूची लागण झाली आहे. लीस्टरशायरविरुद्धच्या सरावाच्या मध्यावर रोहितला कोरोनाची लागण झाली. यामुळे तो हा चार दिवसीय सामना पूर्णपणे खेळू शकला नाही. त्याला आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. बर्मिंगहॅम कसोटीत तो खेळणार की नाही यावर बीसीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, बीसीसीआयने आपला बॅकअप म्हणून मयंक अग्रवालला इंग्लंडला बोलावले आहे. रोहित सध्या हॉटेलमध्ये आराम करत आहे. मुलगी समाराने त्याची प्रकृती कशी आहे हे सांगितले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#RohitSharma Daughter #samaira Today at #Leicester How cute she is ???????? MY FATHER IS TAKING REST IN THE ROOM GOT #covidpositive @ritssajdeh @ImRo45 #ENGvIND @ITGDsports pic.twitter.com/Tbpu0HSUIQ
— Krish✊???????? (@Krishna19348905) June 27, 2022
रोहित शर्मा पत्नी आणि मुलगी समायरासोबत लंडनला आला असून कोरोनाची लागण झाल्यापासून त्याला हॉटेलच्या खोलीत क्वारंटाइन करण्यात आले आहे. तो कोणालाही भेटू शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही. दरम्यान, रोहितची पत्नी रितिका आणि त्यांची मुलगी समायरा हॉटेलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघेही हॉटेलमधून बाहेर आले असताना लॉबीत बसलेल्या कोणीतरी रोहितची मुलगी समायराला त्याच्या तब्येतीची विचारणा केली. समायराने प्रेमाने उत्तर दिले, “बाबा त्यांच्या खोलीत आहेत आणि आराम करत आहेत. ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्या खोलीत कोणीही प्रवेश करू शकत नाही. ते आधीपेक्षा बरे आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
