Share

Sunil Raut | “आरे कारशेड हा तर फडणवीसांचा इगो”- सुनील राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष सुरु आहेत. तर दुसरीकडे दुसरीकडे भाजप शिवसेनेवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. भाजपने सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले अनेक निर्णय बदले आहेत. यातलाच एक सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबई मेट्रोचे कारशेड आधीच्याच जागी म्हणजेच आरे परिसरात करणे. आरे परिसराला मुंबईचं फुफुस म्हणाल जातं. त्यामुळे तिथे वृक्षतोड न करता तो प्रकल्प ठाकरे सरकारने कांजूर मार्ग येथे हलवला. मात्र आता पुन्हा तो प्रकल्प आरे येथेच करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारने ठरवले आहे. त्यावरच भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होत. त्याला आता आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळेच कांजूर मार्गमध्ये मेट्रोचे कारशेड केले जात होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर सुनील राऊत म्हणाले कि, “एक झाड म्हणजे एक जीव आहे. त्यामुळेच कांजूरमार्ग येथे जी सरकारी जमीन पडलेली आहे. त्या ठिकाणी कारशेड केलं तर तीन-साडेतीन हजार झाडांची कत्तल होण्यापासून वाचेल. ज्यामुळे मुंबईच्या लोकांना चांगला ऑक्सिजन मिळेल. परंतु हा उद्धव साहेबांचा इगो नसून देवेंद्र फडणवीसांचा आणि भाजपचा आहे. त्यामुळेच उद्धवसाहेबांनी घेतलेले निर्णय बदलून हे पुन्हा झाडांचा जीव घेण्यासाठी आरेमध्येच कारशेड करत आहेत.”

शिवसैनिकांचा बेस 

पुढे बोलताना त्यांनी पक्षात झालेल्या बंडावर देखील भाष्य केलं. “दहीहंडीत जे थर लागतात ते कुणाच्या जीवावर लागतात? जे खाली जमिनीवर म्हणजेच बेसला उभे आहेत त्यांच्या जीवावर लागतात. त्यामुळे वरचे थर अनेकवेळा कोसळत असतात. पण बेस कधी कोसळत नाही. त्याचप्रमाणे आमचा बेस हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांपासून बनवलेला आहे. त्यामुळेच हा बेस मजबूत आहे. वरचे कितीही कोसळू द्या. आम्ही असे असंख्य थर उभे करू आणि पाडू. आम्हाला त्याची पर्वा नाही. बाळासाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी बनवलेला बेस मजबूत आहे. त्यामुळे आम्हाला वरच्या थराची चिंता नाही.”, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!