Share

Sunil Maharaj | सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश! संजय राठोडांचे भवितव्य धोक्यात?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधले आहे.  अनेक दिवसांपासून ते शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. सुनील महाराज यांनी संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त केली.  राठोड शिवसेना सोडून शिंदे गटात गेले.  त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुनील महाराजांना शिवबंधन बांधून मैदानात उतरवले आहे.  ठाकरे यांनी महाराजांना लोकसभेच्या 5 आणि राज्यातील 5 जागांवर बंजारा उमेदवार देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे.

सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी शिवबंधन बांधल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज पोहरादेवी येथे पंचमीची यात्रा आहे. पंचमीचा मुहूर्त साधून मी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांना भेटलो. आमच्यात अतिशय सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील बंजारा बांधवाना विकासामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी, सत्तेमध्ये वाटा देण्याचे काम फक्त शिवसेनाच करु शकते. हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे.”

शिवसेना एकच आहे-

उद्धव ठाकरे म्हणाले, सुनील महाराज यांच्या प्रवेशाने मला आनंद झाला. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. नवरात्रामध्ये सुनिल महाराज शिवसेनेत आले. केवळ ते एकटे आले नसून बंजारा समाजाचे लढवय्या सैनिक शिवसेनेत आले. यांच्या रक्तात गद्दारी नाही. दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना एकच आहे, आणि  शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) देखील एकच असतो.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!