Share

सोनम कपुरने ‘नीरजा’च्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहसाची करून दिली आठवण

Published On: 

मुंबई :अत्यंत कठीण परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवून प्रवाशांच्या सुखरूपतेसाठी दाखविलेल्या धाडसाचे कौतक करत अभिनेत्री सोनम कपूर यांनी ‘नीरजा’ला वाहीली आदरांजली. नीरजाशी भावनात्मक नातं असल्याचं सांगून भावूक झालेली सोनम कपूर इन्स्टास्टोरी केले शेअर.
‘नीरजा’ चित्रपटात भानोतची भूमिका साकारणाऱ्या सोनमने नीरजा अत्यंत साहसी महिला होती ही आठवण करून दिली. अभिनेत्री सोनम कपूर आहुजा यांनी दिवंगत फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या धैर्य  आणि निर्धाराची आठवण करून आदरांजली वाहिली.

२०१६ मध्ये ‘नीरजा’ चित्रपटात भानोतची भूमिका साकारणाऱ्या सोनमने नुकतेच सोशल मिडिया स्टोरीवर त्यांच्या बद्दल आठवणी जाग्या केल्या. तसेच नीरजाचे धैर्य आणि दृढनिश्चय लक्षात राहण्यासारखं असल्याचं ही सोनमने म्हटलं आहे. पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजच्या भारतीय फ्लाइट अटेंडंट असलेली नीरजाची कहाणी या चित्रपटाद्वार दाखविण्यात आले होते. स्वत:च्या जीवनाची पर्वा न करता ३६० प्रवाशांचे प्राण वाचवून धाडस दाखविली होती.

या चित्रपटाला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. सोनमला बायोपिकमधील भूमिकेसाठी ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही मिळाला. या चित्रपटात सोनमसह ‘नीरजा’मध्ये शबाना आझमी, जिम सरभ, शेखर रावजियानी आणि योगेंद्र टिकू यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. सोशल मिडियावर शेअर केलेल्या स्टोरीमुळे पुन्हा एकदा नीरजाच्या धाडसाची आठवण झाली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!