टीम महाराष्ट्र देशा : ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड हा निवडणुक प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहे. आज सोलापुर मतदार संघात देखील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ आहे असे निदर्शनास आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याचे सांगितले आहे तर सत्ता हातून जाण्याच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी गैरव्यवहार करत असल्याचा आरोप सुजात यांनी केला आहे.
यावर सुजात म्हणाले की, कपबशीला मतदान केले तर मत कमळालाचं जाते आहे.आमचं चिन्ह चौथ्या क्रमांकावर आहे. काही ठिकाणी चौथ्या क्रमांकावर बटन दाबलं जात नाहीये, तर काही ठिकाणी कुठलंही बटन दाबलं तरी कमळाच्या चिन्हाला मत जात आहे, असा दावा सुजात आंबेडकरांनी केला आहे. यामागे नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचं सुजात यांनी म्हंटल आहे.सत्ता जाणार असल्याने नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत, त्यामुळेच सत्तेचा वापर करून मोदी हे असले गैरव्यवहार करत आहेत असा आरोप सुजात यांनी केले आहेत.
दरम्यान सोलापूर मध्ये यंदा तिहेरी लढत पाहिला मिळणार असून दोन ज्येष्ठ आणि अनुभवी नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेस कडून सुशीलकुमार शिंदे तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना रिंगणात उतरवल आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

