Share

६ लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी दाम्पत्यांची आत्महत्या, पीडित कुटूंबाला शासनाची मदत

Published On: 

औरंगाबाद : सततची नापिकी व कर्जबाजारीपणा मुळे सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे पती-पत्नी शेतकरी दाम्पत्यानी आत्महत्या केली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उंडणगाव येथे पीडित कुटूंबाच्या घरी जावून सांत्वन भेट दिली. पीडित कुटुंबाला स्वपदरची तसेच शासनाच्या वतीने आर्थिक मदत, कुटुंबातील मुलांना सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा यासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देवू, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी दिली.

घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून याबाबत पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेईल त्यासोबतच पीडित कुटुंबाला घरकुल, मुलांना जातीचे प्रमाणपत्र, अंत्योदय योजनेतून मोफत धान्य आशा विविध योजनेचा लाभ देण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. एखाद्या घरात कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची वाताहत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याचे कुटुंब उघड्यावर पडते. ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून उंडणगाव येथील पीडित कुटुंब स्वबळावर उभी रहावी यासाठी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केल्या जाईल असे सत्तार म्हणाले.

सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे स्पष्ट करीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचणी असल्यास त्या निदर्शनास आणून द्यावे जेणे करून त्या समस्येची सोडवणूक करण्यात येईल. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत उलट यात वाढ होते त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेवू नये असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!