मुंबई : आज दुपारी २ वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर देखील निशाणा साधलाय. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. तर उद्धव ठाकरेंच्या लाईव्ह नंतर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली या आहे.
सुहास कांदे म्हणाले कि, उद्धव ठाकरेंचा मान ठेवतो. त्यांना प्रश्न विचारायचं आहे की ज्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख टी बाळू असा केला, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा तुम्ही बसलात, तेव्हा आम्हाला, बाळासाहेबांना वरती काही वाटलं नसेल का. ज्या दाऊदनी बॉम्बस्फोट केला, अनेक हिंदू मारले. हजारो लोक मेले. त्याच्याशी संबंधित नवाब मलिकच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता तेव्हा आम्हाला काही वाटत नसेल का. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काय वाटलं, असं म्हणत आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, कायद्यानुसार शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये. मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या

