Share

दक्षिण आफ्रिकेची दिग्गज क्रिकेटपटू लिझेल लीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेची ३० वर्षीय सलामीवीर महिला फलंदाज लिझेल लीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. प्रोटीज संघाला लवकरच इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची असताना तिने हा निर्णय घेतला आहे. लीने १२ सप्टेंबर २०१३ रोजी बांगलादेशी महिला संघाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंतर्गत आफ्रिकन संघासाठी पहिला सामना खेळला. या सामन्यात डावाची सुरुवात करताना तिने ३२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १४ धावा काढल्या.

लिझेल लीने आफ्रिकन महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १८२ सामने खेळले आहेत. यादरम्यान तिच्या बॅटमधून १८५ डावांत ५२५३ धावा झाल्या. लिझेल लीने कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या संघासाठी दोन सामने खेळले. तिने आफ्रिकन संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० सामने खेळले आणि ३३१५ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर तीन शतके आणि २३ अर्धशतके आहेत.

क्रिकेटच्या या दोन फॉरमॅट व्यतिरिक्त, ती टी-२० फॉरमॅटमध्ये देशासाठील ८२ सामने खेळली. यादरम्यान तिने १८९६ धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये तिच्या नावावर एक शतक आणि १३ अर्धशतके आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!