Share

ENG vs IND : इंग्लंडनं मॅच गमावली, पण ख्रिस जॉर्डननं कौतुकास्पद विक्रमाची कामगिरी केली!

Published On: 

मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने टी-२० क्रिकेटचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला (ENG vs IND) भलेही पराभवाचा सामना करावा लागला असेल, पण ख्रिस जॉर्डनने विकेट्सच्या बाबतीत विक्रम केला. ख्रिस जॉर्डन आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.

या प्रकरणात त्याने अनुभवी फिरकी गोलंदाज आदिल रशीदला मागे सोडले जो हा सामना खेळत नव्हता. हा सामना सुरू होण्यापूर्वी ख्रिस जॉर्डन हा विक्रम करण्यापासून केवळ २ विकेट दूर होता आणि त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात ही कामगिरी केली. धोकादायक दिसणाऱ्या दीपक हुडाला जॉर्डनने आधी बाद केले आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ख्रिस जॉर्डनच्या नावावर आता ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८२ विकेट्स आहेत. त्याचवेळी आदिल रशीदने केवळ ६३ सामन्यांत ८१ विकेट घेतल्या आहेत. जॉर्डनने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून, तो इंग्लंडच्या गोलंदाजीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

साऊथम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडचा ५० धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १९.३ षटकांत १४८ धावांवर गारद झाला. हार्दिक पंड्याने भारतीय संघासाठी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फलंदाजीत केवळ ५१ धावा केल्या, यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आणि अवघ्या ३३ धावांत ४ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!