मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची 24 लाख 56 हजार 469 रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा पुरातन, मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा शिवगिरी.
तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदनवन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जेतवन, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा चित्रकुट, मंत्री राजेश शिंगणे यांचा सातपुडा, नवाब मलिक यांचा मुक्तागिरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा रामटेक आणि सभापती रामराजे निंबाळकर यांचा अजंता तसेच सह्याद्री अतिथी गृहाची पाणीपट्टी थकली आहे. या सर्व बंगल्यांची एकूण पाणीपट्टी 24 लाख 56 हजार 469 रुपये एवढी असल्याने पालिकेने त्यांना डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे.
दरम्यान, सामान्य मुंबईकरांनी पाणीपट्टी थकवली तर त्यांचे पाणी कापले जाते. त्यामुळे महापालिका मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही अशीच कारवाई करणार का? असा सवाल केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- …तर हजारो मध्यमवर्गीयांच्या साथीने भाजपा आंदोलन करेल,चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
- कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देत जनहिताचे निर्णय घेतले – मुख्यमंत्री
- विधिमंडळाच्या सभागृहाच्या पटलावर ‘हे’ अध्यादेश आणि विधेयक मांडले जाणार
- ‘कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच; शेतकऱ्यांनी दोन पाऊले मागे हटून सरकार शी चर्चा करावी’


