Share

लातूरच्या नगरसेवकाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पैसे केले परत

Published On: 

लातूर : लहानपासूनच आपल्यावर प्रामाणिकपणाचे धडे गिरवले जातात. हे धडे आपल्याला पुढे चालून उपयोगी पडतात. याचे उदाहरण म्हणजे लातूर शहरातील एका नगरसेवकाने रस्त्यावर पडलेले पैसे मूळ मालकाला परत केले आहे. या सामाजिक बांधिलकी द्दल पोलिसांनी इम्रान सय्यद यांचा सन्मान केला.

नगरसेवक इम्रान सय्यद व त्यांचे काही सहकारी दयानंद भाजी मंडई भागातून जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेले पॉकेट सापडले. त्यामध्ये ओळखपत्र आणि 20 हजार रुपये होते. ओळखपत्राच्या आधारे संबंधीत व्यक्तीच्या घरी जाऊन इम्रान सय्यद यांनी ते पैसे परत केले आहेत. या सामाजिक बांधिलकी बद्दल पोलिसांनीही त्यांचा सन्मान केला आहे. मुलीच्या लग्न खरेदीच्या घाईत ही रक्कम गहाळ झाली होती.

दयानंद कॉलेजजवळ असलेल्या या भाजी मंडईमध्ये नेहमीच गर्दी असते. या गर्दीत हरवलेले पॉकेट सय्यद यांना मिळाले. यामध्ये आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे होती. आधारकार्ड आणि इतर कागदा पत्रावरुन संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर शोधून संपर्क करण्यात आला. त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना त्यांचे पैसे आणि पॉकेट देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!