Share

वनमंत्री पदावर काम करण्यासाठी हरिभाऊ राठोड यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Published On: 

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यांनतर विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली, आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाविषयी आक्रमक भूमिका घेतली होती. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात या रिक्त जागेसाठी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी या रिक्त पदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

वनमंत्री या पदावर काम करण्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा असे लिहिले असून अशी दोन पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. या पत्रातील मजकुरात पुढे त्यांनी लिहिले आहे की, बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असत.

संजय राठोडच्या जागी मला मंत्री करा!, हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना  पत्र | Haribhau Rathodes letter to the CM Uddhav Thackray appoint me a  Minister in place of Sanjay Rathode

तसेच त्यांनी पत्रात असेही म्हंटले आहे की, विधानसभा निवडणुकीत मी शिवसेनच्या १४ स्वतंत्र सभा घेतल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रक काढून कार्यकर्ते पाठवून शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आवाहन केले, याची संपूर्ण माहिती मा.सुभाषजी देसाई यांना आहे. त्यामुळे शिवसेनाला महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात सुद्धा शिवसेना वाढीसाठी माझी मदत होऊ शकते असा मला विश्वास वाटतो, त्यामुळे संजय राठोडचे मंत्री पद मला देण्यात यावे, अशी नम्र विनंती आहे. अश्या पद्धतीचे पत्र हरिभाऊ राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. आता या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!