Share

‘परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन’ ; मोहब्बते स्टाईलमध्ये वीरूने सचिनबाबत केले भन्नाट ट्विट

Published On: 

🕒 1 min read

रायपूर : भारतात सध्या  इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा  सुरु आहे. या स्पर्धेत 5 मार्चला बांगलादेश लिजेंड्स  विरुद्ध इंडिया लिजेंड्स India Legends यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या अनेक वर्षांनतरही वीरेंद्र सेहवागचा  जलवा कायम आहे. सेहवागने आपल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात सेहवागने विजयी खेळी साकारली. सेहवागने एकूण 35 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग मोठी आणि अनुभवी जोडी मैदानात आली. वीरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळीला सुरुवात केली. सेहवागने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सेहवागने गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला.

सेहवागने अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्याने सिक्स खेचत हे अर्धशतक झळकावलं. तर सोबत असलेल्या सचिनने सेहवागला चांगली साथ दिली. सचिनने सेहवागला स्ट्राईकवर खेळण्याची संधी दिली. दरम्यान, विस्फोटक खेळीनंतर वीरूने केलेले तितकेच धमाकेदार ट्विटही चर्चेत आले आहे.

या ट्वीटमध्ये वीरूने सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा सलामीला खेळतानाचा अनुभव शेअर केला आहे. या ट्विटमध्ये वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन. दुसऱ्या बाजूने सचिन पाजी उभे असताना फटकेबाजी करण्याचा अनुभाव काही औरच असतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!