औरंगाबाद : झटपट श्रीमंत होण्यासाठी एका आरोपीने शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करण्याचा प्रकार सुरु केला होता. या चोरलेल्या दुचाकी तो भंगारात विकायचा आणी आलेल्या पैशात नशा करत होता. महत्वाची बाब म्हणजे हा आरोपी दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता.
पडेगाव परिसरात राहणारा शेख अल्तमश शेख अब्दुल्ला असे या चोराचे नाव आहे. अल्तमश हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. त्याच्या कडे चोरीच्या दुचाकी आहे अशी माहिती क्रांती चौक पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार निरिक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पोलिस पथकाचे उपनिरीक्षक संतोष राऊत, पोलिस नाईक मनोज चव्हाण विलास वाघ यांनी अल्तमशला सापळा रचून ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या आठ दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. अल्तमश कडे आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता क्रांती चौक पोलिसांनी वर्तवली आहे. शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीचे प्रमाण वाढतच आहे. या पार्श्वभुमिवर क्रांती चौक पोलिसांनी दुचाकी चोराविरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग अनुभवी जोडी मैदानात, पाहा तो व्हिडीओ
- जितनी चाहा उतनी मोहब्बत नही मिली, मुनाफेको छोडो लागद भी नही मिली; आमदाराची अधिवेशनात ‘दर्दी’ शायरी
- पंतच्या शतकानंतर ‘हा’ खेळाडू म्हणाला, ‘अरी दादा ! मजौ आगौ’
- महागाईचे चटके वाढले मात्र केंद्र सरकारच्या सर्वच पातळय़ांवर तसा ‘सन्नाटा’च’
- कांचनवाडी येथील पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प; पहिल्या टप्प्यात २ एलएमडी पाण्यावर प्रकल्प
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

