नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. विरोधक टीका करत असतानाच भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला संबोधित करून अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केलं आहे. सुरुवातीला मोदींनी सीतारामन यांचे आभार देखील मानले आहेत. तर, ‘असे चांगले अर्थसंकल्प कमीच पाहायला मिळतात,’ असे कौतुकाचे उद्गार देखील त्यांनी काढले. ‘ आजच्या अर्थसंकल्पानं देशाचा आत्मविश्वास सर्वांपुढं आणला आहे. संपूर्णपणे आत्मनिर्भरतेकडे कल असणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये समाजातील प्रत्येक विभागाला प्राधान्य देण्यात आलं आहे’ असं ते म्हणाले.
‘या बजेटमध्ये संशोधनावर आधारित प्रगती करण्यासाठी प्रयत्न केला आहे. संधीची समानता हे सूत्र लक्षात घेऊन या बजेटमध्ये महिलांसाठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एमएसएमई क्षेत्राला चांगला निधी देण्यात आला आहे.’ असं भाष्य देखील पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
शेअर बाजारात उसळी !
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने सलामी दिली आहे. अर्थसंकल्पाचं स्वागत करत सेन्सेक्स १६५० अंकांनी वधारला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२०० वर पोहोचला असून निफ्टीनेही ३५० अंकांची वाढ नोंदविली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सेन्सेक्स १६५० अंकांनी व निफ्टी ४७० अंकांनी वधारला.
महत्वाच्या बातम्या
- हा अर्थसंकल्प काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी- बाळासाहेब थोरात
- ‘सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प’
- नाफेडच्या तूर खरेदीला आजपासून प्रारंभ
- ‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिटे बोलावं’
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला

