अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या निर्णायक सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या सुर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत सर्वांची मने जिंकत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीनंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्यात एक विलक्षण योगायोग जुळून आला आहे.
रोहित शर्माने आपल्या टी-२० अंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात ही २००७ विश्वचषकात केली होती. त्याने पदार्पण केलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला फंलदाजीची संधी मिळाली नव्हती. हा सामना युवराज सिंगच्या ६ षटकारामुळे लक्षात राहीला. मात्र दुसऱ्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामन्यात रोहितला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आणि या संधीचे सोने करत रोहितने अर्धशतक झळकावत नाबाद अर्धशतक झळकावले. या सामन्यात भारताचा वियय झाला आणि रोहितला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवीण्यात आले.
हाच विलक्षण योगायोग सुर्यकुमारच्या बाबतीत पहायला मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवचे पदार्पण झाले. मात्र आपल्या पदार्पनाच्या सामन्यात सुर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यांनतर मालिकेतील चौथ्या सामन्यात सुर्यकुमारला संधी मिळाली आणि अर्धशतक झळकावले. भारताकडून फलंदाजीला उतरल्यावर रोहित आणि सुर्यकुमार दोघांनीही अर्धशतक झळकावले आणि दोघेही सामनावीराचे मानकरी ठरले. मुंबई इंडियन्सने याबाबत ट्विट करुन माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- शहरात येताय, सावधान! ‘स्वॅब’से करेंगे सबका स्वागत
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

