मुंबई : कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला होता. मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि तरुणींना बेदम मारहाण केली. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी मारहाण करत तरुणींचा विनयभंग केला. याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या पीडित तरुणींची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपींसह तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची मागणी केली होती.
यानंतर पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढल्याने पाच आरोपींना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. आरोपी हे कुशिवली परिसरातील रहिवाशी आहेत.
‘मलंगगडावर तरूण तरूणींवर झालेला हल्ला विनयभंग ही दुर्दैवी घटना आहे. नेवाळे पोलीस ठाण्यात गेल्यावर तिथल्या पोलिसांनी दखल न घेणे हा गंभीर प्रकार आहे.याची चौकशी व्हायला हवी. समाजकंटकावर कारवाई करत वेळीच आवर घालावा. अन्यथा नागरिकांना पर्यटनस्थळी देखील स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊन जावे लागेल’ असा इशारा वाघ यांनी दिला होता.
यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. सोमनाथ वाघ, अशोक वाघ यांच्यासह एकूण पाच आरोपींना हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
काय आहे प्रकार?
रविवारी, दि.१ ऑगस्ट रोजी संबंधित युवक-युवती कल्याण परिसरातील मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी काही टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

