मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.
या सामन्यात दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत राजस्थान संघासमोर निर्धारित २० षटकात ८ गडी गमावत १४७ धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीच्या संघाकडून कर्णधार रिषभ पंतने शानदार अर्धशतक झळकावले. सामन्यातील १३व्या षटकातील चौथ्या चेंडुवर धाव घेताना रियान परागने रिषभ पंतला धावबाद केले. धोकादायक ठरणारा रिषभ पंत बाद झाल्यानंतर रियान परागने आनंदाने त्याचा आवडता बिहु डान्स करु लागला.
The mood in @rajasthanroyals camp is being perfectly depicted by @ParagRiyan on the field. The delightful Bihu dance returns. ????https://t.co/SClUCyj1Xs #RRvDC #VIVOIPL pic.twitter.com/XFkG8Xkx6z
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2021
रियान परागचा हा डान्सचा विशेष व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. रियानला या अगोदरही बऱ्याचदा बिहू डान्स करताना बघीतले गेले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ८ गडी गमावत १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या राजस्थानच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यानंतर पहिला सामना खेळत असलेल्या डेव्हिड मिलरने ६२ धावा करून राजस्थानचा डाव सांभाळला. पण मिलर बाद झाल्यानंतर ख्रिस मॉरिसने ४ षटकारांच्या मदतीने १८ चेंडूत ३६ धावांची विलक्षणीय खेळी करून राजस्थानला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या
- बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती- पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका
- दोन वेळच्या जेवणासाठी देखील केंद्राला पत्र लिहून मागणी करतील; राणेंचा ठाकरेंवर प्रहार
- कोरोनामुळे वाढदिवसाला कोणीचं नाही; वडिलांनी फोन करून पोलिसांनाचं बोलावलं, रितेशने शेअर केला व्हिडिओ
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाच्या नावावर जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम


