Share

केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक, म्हणाले…

Published On: 

मुंबई :  केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड सोमवारी दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. यावेळी भागवत कराड यांनी प्रोटोकॉल मोडली पण डॉक्टरची भूमिका यावेळी चोख बजावली आहे.

कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. विमानातील क्रू मेंबर्सने उद्घोषणा करुन ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली. या प्रवाशाचा रक्तदाब कमी झाल्याने त्या फार घाम येत होता. केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन त्याला प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याचे सर्वानीच कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.

इंडिगो एअरलाइन्सने डॉक्टर कराड हे रुग्णाला मदत करत असतानाचा फोटो ट्विट करत त्याचं कौतुक केलं आहे. इंडिगोने ट्विट करत लिहिले की, ‘आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या कर्तव्याबद्दल नेहमीच दक्ष असणाऱ्या या केंद्रीय मंत्र्याचं आम्ही कौतुक करतो. डॉक्टर कराड यांनी एका प्रवाशाला मदत करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली तयारी ही खरोखरच प्रेरणादायी आहे,’ असं म्हणत डॉक्टर कराड यांचे आभार मानले आहे.

पंतप्रधान मोदींनीही इंडिगोचे हे ट्विट कोट करुन रिट्विट करत, ‘ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे,’  असं पंतप्रधान म्हणाले. यावर रिप्लाय देताना डॉक्टर कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच तुम्ही दाखवलेल्या ‘सेव आणि समर्पण’ या मार्गावरुनच मी जनतेची सेवा करत आहे, असंही कराड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!