Share

विद्यार्थ्यांना दोन दिवसांत प्रश्नपेढी मिळणार; उदय सामंत

Published On: 

मुंबई: विद्यार्थ्यांना वेठीस न धरता सर्व विद्यापीठांसाठी एकच पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.पुणे,औरंगाबाद आणि मुंबईसारखी विद्यापीठे फक्त एमसीक्यूला (बहुपर्यायी परीक्षा) पर्याय म्हणून पाहत आहेत. यातून विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे कामच सुरू आहे.

विद्यापीठांनी ऑनलाइन किंवा संकरीत पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, यामध्ये विद्यार्थ्यांना ई-मेल अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाऊ शकते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांना येत्या २ दिवसांत सरावासाठी प्रत्येक विद्यापीठाकडून प्रश्नसंच पुरविण्यात येतील, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली.

विद्यापीठासह, राज्यातील बहुतांश विद्यापीठे एमसीक्यू पद्धतीचा वापर अंतिम वर्ष परीक्षांसाठी करणार आहेत. मुंबई विद्यापीठाकडून तर विद्यापीठ अधिष्ठाता, महाविद्यालय प्राचार्य यांनी प्रश्नपेढी तयार करून या परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत. या प्रकारच्या परीक्षा पद्धतीचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. प्रश्नसंच सरावासाठी मिळणार असले तरी या प्रश्नसंचातीलच प्रश्न परीक्षांना विचारले जाणार का? त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का, असे प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!