भोपाळ : गेले काही दिवस सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून सुरु झालेला वाद आता महाराष्ट्रात तापला असून कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा ‘सामना’च रंगला आहे. कंगनाने मुंबई पोलीस आणि व्यवस्थेविरुद्ध गंभीर प्रश्न उभे केल्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील कंगनावर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी कंगनाला चांगलेच सुनावल्यानंतर कंगनाने आपला मोर्चा संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला. संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर म्हणत मुंबईसह महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे बोलले होते. तर, मुंबईमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा देखील दिला होता. पुढे हे हा वाद एकमेकाचा बाप निघेपर्यंत वाढला.
यानंतर, याप्रकरणाने मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर कंगना रणौतने अधिकच आक्रमक भूमिका घेत संजय राऊत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख केला होता. आता करणी सेना देखील कंगनाच्या बाजूने उभी राहिली असून भोपाळमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे.
पहा सविस्तर व्हिडिओ


