जालना : देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं परंतु महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाची माती केली असा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिक्षण आणि शासकीय सेवेत मराठा समाजाला आरक्षण देऊन 1 डिसेंबर 2018 पासून राज्यात मराठा आरक्षण हे विधेयक लागू करण्यात आलं व त्यात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 16 टक्के आरक्षणही देण्यात आलं होतं. पण आता या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेलय अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.
पहा सविस्तर व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

