Share

शिवसेना दाऊदला घाबरते, आठवलेंचा जोरदार प्रहार…

Published On: 

मुंबई : आताची शिवसेना दाऊदला घाबरते असा घणाघाती टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनाला लगावला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, कंगनाने, माझा अपमान झाल्याचं सांगितलं. जेवढं जादा बांधकाम झालं होतं, तेवढंच तोडायला हवं होतं, कोर्टात जाऊन नुकसान भरपाई मागणार असल्याचं कंगनाने म्हटलं असल्याचं, आठवले यावेळी म्हणाले म्हणाले आहेत.

मुंबई सर्व जाती-धर्माच्या सर्व लोकांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. रिपाई कंगनासोबत आहे. जाणूनबुजून त्रास देण्याचं काम सुरु आहे. बदल्याच्या भावनेतून कारवाई असल्याचं, आठवले म्हणाले. या मुद्द्याशिवाय इतर अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं आठवलेंनी सांगितलं. तसंच, कंगना आरपीआयमध्ये आल्यास १०० टक्के स्वागत करेन, तर भाजपमध्ये आल्यास ५० टक्के स्वागत करेन, असंही ते म्हणाले.

कंगनाचं कार्यालय पाडणं चुकीचं आहे. शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे. शिवसेना दाऊदला घाबरते, असा टोलाही आठवलेंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

सावंत तुझी लायकी गल्लीत बोलण्याइतकी नाही तू महाराष्ट्रच्या बाता करू नको – निलेश राणे

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली, पहा विनोद पाटील काय म्हणाले!

करणी सेनेकडून संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!