मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये घट होत होती. कुणाची स्थिती आटोक्यात आल्यामुळे मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाचवी ते बारावीच्या शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाच संकट पुन्हा वाढलं आहे. साताऱ्यामध्ये ३५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासह इतर काही जिल्ह्यांत देखील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समजत आहे.
या दृष्टीने आता शाळा सुरु ठेवायच्या की नाही याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. ‘राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत.’ असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 25, 2021
पुढे त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी, मा. समाजकल्याण मंत्री व मा. आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे.’ असं देखील शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …हे मोदी सरकारच्या चिवट झुंझीचं यश; नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- १० दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार ; ‘या’ दिवशी मांडणार अर्थसंकल्प
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

