औरंगाबाद : सध्या आयटीआय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच आयटीआयच्या दोन फेऱ्या देखील झाल्या आहेत. या दोन फेऱ्यांमध्ये औरंगाबाद विभागातून आतापर्यंत एकूण ६ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. महाराष्ट्राच्या एकूण प्रवेशाचा विचार केला तर मागील वर्षीच्या तुलनेत दोन फेरीतील प्रवेशाच्या एकूण अहवालानुसार विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढला आहे.
दरवर्षी आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. यंदा औरंगाबाद विभागातून आयटीआय अभ्यासक्रमाला १९ हजार ६६४ जागांसाठी प्रवेश प्रकिया राबविण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या फेरीत औरंगाबाद विभागातून ४ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर दुसऱ्या फेरीत २ हजार २०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. असे एकूण दोन फेऱ्यात ६ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
यंदा आयटीआयला विद्यार्थ्यांची संख्या वाढली
आयटीआय अभ्यासक्रमाला मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी पहिल्या फेरीत २५ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतले होते. तर यंदा महाराष्ट्रातून पहिल्या फेरीत ३१ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. याशिवाय आयटीआयला मागील वर्षी दुसऱ्या फेरीत १३ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर यंदा महाराष्ट्रातून एकूण १५ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतले आहेत. यावरून यंदा आयटीआयला विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून


