Share

ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण भाजपला पुरून उरेल – संजय राऊत

Published On: 

मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. तर, भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे.

भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक एकूण आठ टप्प्यांत पार पडणार असून आज या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान होत आहे. दरम्यान, या लढतीवर शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांनी भाष्य करताना भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘ही निवडणूक महाभारतापेक्षाही भयंकर आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी केंद्रातील सरकार हे महाभारत घडवत आहे. मात्र, भाजपने कितीही ताकद लावली तर ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण या सर्वांना पुरून उरेल,’ असं संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.

ममतादीदींची देशभरातील भाजप विरोधी नेत्यांना साद –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या १५ नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!