Share

कडकडीत बंद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जळगावकरांनी दाखवून दिली एकजूट

Published On: 

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रसार होऊन ३ महिने झाले असून बधितांचा वाढता आकडा हा वाढत आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख १२ हजारांवर गेली असून गेल्या २ ते ३ दिवसात अनेक जिल्ह्यात कोरोनाने उच्चांक गाठला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ७ जुलैपासून जळगाव शहरात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जळगावकरांनी या आदेशाचे पालन करुन व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले.

जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. एकट्या जळगाव शहराने हजाराचा आकडा पार केल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे ही साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ७ ते १३ जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनला जळगावकरांनी आपली एकजूट दाखवून दिली. पहिल्या लॉकडाऊनपेक्षाही या लॉकडाऊनला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळापासूनच सामसूम होते. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी मंडळीच असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती.

लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे जळगाव शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरु चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक सामसूम होते. नेहमी वर्दळ असलेले शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाणे पूर्णपणे बंद होती. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. प्रत्येक चौक व रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस प्रत्येक व्यक्तीला अडवून चौकशी करीत होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले जळगावकर नागरिक, व्यापारी, उद्योजक बांधव यांच्या सहकार्याने लॉकडाऊनचा पहिला दिवस यशस्वी ठरला. त्यामुळे हे सर्व जण अभिनंदनास पात्र आहे. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी १०० टक्के सहभाग नोंदविला. पहिल्या दिवसाप्रमाणे सातही दिवस नागरिकांचे सहकार्य राहिल्यास नक्कीच कोरोनाला आळा बसविता येऊ शकले.

महास्वयम पोर्टल असताना महाजॉब नावाचं पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून का बनवलं ?

शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

लद्दाख दौऱ्याचे पवारांनी केले समर्थन; सर्वपक्षीय बैठकीत दिला ‘हा’ सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!