औरंगाबाद : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. औरंगाबादमध्ये देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची कमालीची वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. २५ जून रोजी त्यांना घाटी रुग्णालयातून या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल झाल्यापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.
उपचार सुरू असताना त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. कोविड विथ मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णलयाच्या प्रशासनाने सांगितले.
कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हजारवर, महाराष्ट्र पोलिस विभागाची माहिती
बटाटा महाग कांदा स्वस्त, प्रती किलोला आहे ‘इतका’ भाव
मोठी बातमी : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लसदेखील यावर्षी येणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

