नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लद्दाख दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी खुलासा केला कि, मोदींच्या या दौऱ्यावर आपण आश्चर्यचकित नसून १९६२ च्या युद्धानंतर देखील तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि रक्षामंत्री यशवंत राव चव्हाण यांनी देखील सीमा भागाचा दौरा केला होता.
राजगृह तोडफोड प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करा देवेंद्र फडणवीसांची मागणी
पवार म्हणाले, १९९३ मध्ये ते स्वतः रक्षामंत्री असताना ते चीन च्या दौऱ्यावर गेले होते आणि एका सामंजस्य करारावर हस्ताक्षर केले होते, त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य मागे हटले होते. त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठकीवर देखील खुलासा केला, ‘सर्व वर्तमान मुद्द्यांना लक्षात घेऊन या चीन वादाला राजनैतिक चर्चेतून सोडवण्याची गरज असून चीनवर अंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याची आवश्यकता असल्याची’ , देखील सांगितली.
पवारांच्या या वक्तव्याला व समर्थनाला राजकीय दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे. शिवसेना व काँग्रेसने भारत-चीन मुद्द्यावर विविध प्रश्न उपस्थित करून मोदींना घेरण्याचे प्रयत्न चालू केले होते. ‘आपले सैनिक विना हत्यार का होते’ आणि ‘चिनी सैनिकांनी आपल्या भागात प्रवेश केलाच कसा’ असे प्रश्न निर्माण केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील हत्यारांवर असलेल्या प्रोटोकॉलचा खुलासा केल्यानंतर शिवसेनेने आपला मार्ग बदलत वाढत्या कोरोना संकटावरून मोदींवर पुन्हा टीका केली होती.
संतापजनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड
नुकतेच, शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. याचे प्रसरण अजून बाकी असून त्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून, त्यावर पवार काय खुलासा करणार हे औत्सुक्याचे आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

