Share

महास्वयम पोर्टल असताना महाजॉब नावाचं पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून का बनवलं ?

Published On: 

मुंबई : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. ठाकरे यांनी लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शाळेच्या फीबाबत पालकांना दिलासा देण्यासाठी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर “महाजॉब्स” नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली. मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करतांना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज च्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असेही ते म्हणाले.

महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भूमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आमदार राम कदम यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिवसेनेकडे असणाऱ्या उद्योग खात्याने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून महाजॉब नावाचं पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलं परंतु अशा स्वरूपाचं पोर्टल राष्ट्रवादीकडे खाते असणाऱ्या नवाब मलिक यांच्या डिपार्टमेंट मध्ये महास्वयम या नावानं याआधीच कित्येक वर्षापासून अस्तित्वात आहे मग प्रश्न निर्माण होतो शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव ? की आपसातील भांडण ? की तरुणांना जॉब मिळाल्यावर दोन्ही पक्षांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न ? पोर्टल च्या निमित्तानं कुणाचे उखळ पांढर करण्याचा प्रयत्न ? महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टीस नेमके काय कारण ? आमच्या पोलिसांचा कापलेला पगार द्यायला पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारने याचे उत्तर द्यावे असं आवाहन कदम यांनी केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!