Share

कडक निर्बंधांमुळे एसटीचे उत्पन्न घटले, एसटी कामगार पुन्हा एकदा आर्थिक संकटात!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत एसटीची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एसटी मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून याचा परिणाम थेट चालक-वाहकांच्या पगारावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पन्न शून्य असल्याने वेतन कसे द्यायचे हा प्रश्न एसटी महामंडळासमोर पडला आहे. तर पगारपाण्याशिवाय घर चालवायचे तरी कसे या प्रश्नाचे चालक-वाहक चिंतेत सापडले आहेत.

गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक फेऱ्यामधून एसटी बाहेर पडत नाही तोच पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या आर्थिक चिखलात एसटीचे चाक अडकले आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. हजारो कोटींचा भुर्दंड एसटीला सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा वाढणारी रुग्ण संख्या पाहता कडक निर्बंधांमुळे औरंगाबाद एसटी विभागाला दररोज ३० ते ३५ लाखांचा तर महिनाभरात सरासरी १ कोटींपर्यंत नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

औरंगाबाद विभागातील स्थानकांवर सध्या शांतता आहे. निर्बंधात बसमध्ये पन्नास टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. औरंगाबादहून विविध शहरांकडे जाणाऱ्या बसला प्रवासी नसल्याने औरंगाबादहून जाणाऱ्या आणि औरंगाबादला येणाऱ्या सर्वच बससेवा बंद आहे. गेल्या लॉकडाउनच्या काळातही कर्मचाऱ्याच्या पगाराचा मुद्दा गाजला होता. यानंतर शासनाने दिलेल्या पैशांमधून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला होता.

या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात एसटीला उत्पन्न कमी मिळाले आहे. मे महिन्यात तर एसटीचे उत्पन्न अतिअल्प आहे. एसटीला मालवाहतुकीतून थोड्या फार प्रमाणात उत्पन्न चालू आहे. एप्रिलचा पगार देण्यासाठी शासनाने १३० कोटी रूपये दिले होते. त्यातून पगार देण्यात आलेले आहे. पुढील महिन्यात मेचा पगार देण्यासाठी एसटीकडे पैसे राहणार नाहीत. यामुळे मेचा पगार होणार किंवा नाही, याची चिंता कर्मचाऱ्यांना लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!