Share

चिंताजनक! देशातील १८ राज्यात रुग्णवाढीचा दर २० टक्क्यांहून जास्त

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेले काही दिवस २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या २४ तासात भारतात ३ लाख ४८ हजार ४२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात ३ लाख ५५ हजार ३३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

देशातील १२ राज्यात १ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर १६ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तर १८७ जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन आठवड्यात रुग्ण संख्या कमालीची घटल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात करोना रुग्णवाढीचा दर १५ टक्क्याहून अधिक आहे. ८ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ ते १५ टक्के आहे. तर ४ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांहून कमी आहे.

देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात करोना रुग्णवाढीचा दर १५ टक्क्याहून अधिक आहे. ८ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ ते १५ टक्के आहे. तर ४ राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांहून कमी आहे. देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १७ कोटीहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.

आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ५४ हजार १९७ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३७ लाख ४ हजार ९९ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!