🕒 1 min read
औरंंगाबाद : तक्रारदार शेतक-याच्या विहिरीसाठी नवीन वीज कनेक्शन देण्याची कारवाई करण्यासाठी शासकीय फि म्हणून ७ हजार रूपये आणि लाच म्हणून ३ हजार ५०० रूपये मागणा-या महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अ;ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.१२) दुपारी वैजापुर रोडवरील मुरारी पार्वâ येथे करण्यात आली.
बाळनाथ निवृत्ती जोरे (रा.पाटील गल्ली, वैजापुर,) असे लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. तक्रारदार शेतक-याची वैजापूर तालुक्यातील सटाणा शिवारात शेतजमीन आहे. शेतातील विहिरीसाठी ७.५ एच.पी.चे विज कनेक्शन मिळण्यासाठी तक्रारदार शेतक-याने महावितरणच्या वैजापुर ग्रामीण -२ कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ असलेल्या बाळनाथ जोरे यांनी नवीन विज कनेक्शनसाठी शासकीय फि म्हणून ७ हजार रूपये आणि ३ हजार ५०० रूपये लाच देण्याची मागणी केली होती.तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अ;ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अ;ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, प्रभारी अपर अधीक्षक मारूती पंडीत, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर, पोलिस अंमलदार भीमराव जीवडे, रविंद्र काळे, भुषण देसाई, देवसिंग ठाकुर यांनी वैजापुर रोडवरील मुरारी पार्वâ येथे सापळा रचून ३ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारणा-या बाळनाथ जोरे यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वैजापुर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर


