🕒 1 min read
औरंंगाबाद : पूर्ववैमनस्यातून युवकाचा चाकूने गळा कापून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात शेख शाजेब शेख खलील (वय २०) आणि शेख खलील शेख अब्दूल रज्जाक (वय ४३, रा. दोघे रा. नारेगाव सुलतानपुर) या दोघांच्या पोलीस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. कांबळे यांनी बुधवारी (दि.१२) दिले.
कुंभेफळ शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर शेख आमीर शेख नजीर (वय २०, रा.दर्गाह मशिदजवळ, नारेगाव) या युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. प्रकरणात मयताचा भाऊ शेख अजिज शेख नजीर याने दिलेल्या फिर्यादीवरुन करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेख आमीर याचा खून करणार्या शेख कामील उर्फ गुड्डू आणि अल्पवयीन मुलाच्या मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याचे समोर आले.
त्यानूसार पोलिसांनी शेख शाजेब व शेख खलील या दोघांना अटक केली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत, आमेरचा खून करण्याचा कट सुलतानपुर, नारेगाव येथे रचल्याची माहिती दिली. कटानूसार, शेख कामील उर्फ गुड्डू, शेख चांद यांनी आमेरला रिक्षात त्यावेळी वरील दोघे आरोपी देखील रिक्षात होते. त्यांनतर आरोपींनी आमरेला दारु व नशेच्या गोळ्या आणि गांजा पाजला. केंब्रील चौका जवळ एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध केले. त्यानंतर कुंभेफळ येथे आरोपी आमेरला घेवून आले. तेथे आरोपींनी रचलेल्या कटानूसार आमेरचा खून केला व महिलेला पुन्हा केंब्रीज चौकात सोडल्याची कबुली आरोपींनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर


