Share

‘वाहतुक शिस्त आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायद्यांचा बडगाही उगारावा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रस्ते अपघात आणि वाहतुक शिस्त यांची वेळोवेळी चर्चा होत असताना देखील राज्यातील अपघातांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर कठोर कायद्यांचा बडगाही उगारावा’, असे मत अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी व्यक्त केले आहे.

‘नियम अटी या सगळ्या आपल्याच सुरक्षेसाठी आहेत हे माहिती असूनही काही लोक अगदी बेशिस्तसारखे वागतात. विना हेल्मेट घालणा-यांवर तर जबर दंड ठोठायला हवा. जबाबदारीने वागणे आपले कर्तव्य आहे.’ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले विचार मांडले.

त्याचबरोबर त्यांनी या अपघातांमध्ये रस्त्यांची अवस्था देखील जबाबदार असल्याच म्हटल रस्त्यावर असंख्य खड्डे असतात. खड्डे चुकविताना आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. आपल्या सुरक्षेची काळजी आणि अपघाताची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे येणार नाही. ही खबरदारी आपल्यालाच घ्यायची आहे. कोरोना संक्रमाणाच्या काळात आपण तोंडावर मास्क घालायला आणि सॅनिटायझर्स वापरायला शिकलो. तसेच, मोटारसायकल चालविताना कायम हेल्मेट घालायलाही शिका, असा सल्लाही अनासपूरे यांनी दिला. प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर वाहतूक पोलिसांना अशा जनजागृती मोहिमा राबवाव्या लागणार नाहीत. तो दिवस लवकरच येईल, अशी आशा अभिजीत खांडकेकर यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!